You are currently viewing मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेची नागपूर शहर समितीची मिटिंग

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेची नागपूर शहर समितीची मिटिंग

*मराठी साहित्य संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचा मान यंदा मिळणार नागपूर शहराला*

नागपूर :

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेची नागपूर शहर समितीची मिटिंग दिनांक २३ जून २०२३ रोजी झाली आणि त्यात नारायणा विद्यालयम या शाळेची जागा मराठी साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या तारखेवर शिक्का मोर्तब करण्यात आले. यंदाचा हा मान नागपूर शहराला मिळाला हे विशेष होय , या मिटिंग मधे श्री. नरेंद्र मोहिते ( नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष ), श्री. प्रवीण उपलेंचवार ( नागपूर शहर उपाध्यक्ष ) , श्री. रत्नाकर मुळीक ( नागपूर शहर उपाध्यक्ष ) सौ. नीता चिकारे ( नागपूर शहर कार्याध्यक्ष ) आणि वर्धा येथील शिक्षण महर्षि मा. पंडित श्री. शंकर प्रसाद अग्निहोत्री हे उपस्थीत होते. सर्वांनीच हे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . या संमेलनाचे उद्घघाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीनजी गडकरी साहेब करणार आहेत हे विशेष होय . लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा प्रसिद्ध करण्यात येईल असे मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष श्री.सिध्दार्थ कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. नागपूर शहर वासियांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन सिद्धार्थ कुलकर्णी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आपली

सौ.नीता प्रकाश चिकारे

नागपूर शहर कार्याध्यक्ष

मराठी साहित्य मंडळ

प्रतिक्रिया व्यक्त करा