You are currently viewing वनहरिणी वृत्त

वनहरिणी वृत्त

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*

*वनहरिणी वृत्त*

*मीलन*

पानफुलांना दवबिंदूंनी अंगोपांगी छान भिजवले
हिरव्या हिरव्या पानांवरती ऊन कोवळे नाच नाचले

टीपटीप हे थेंब धरेवर पहाटवेळी धुंद वाजले
पक्षांनीही तालावरती गीत खुशीचे मस्त गायले

पंखाखाली उबेस बसले पिल्लू डोकावया लागले
सोनेरी किरणांत न्हाउनी बाळ शहाणे आज वागले

आषाढातच मेघराजही नभांगणी जोरात भांडले
कडकड कडकड करीत सारे आसमंतही पहा गरजले

वाऱ्या संगे काळे ढगही पर्वताकडे जलद सरकले
चिंब भिजावी धरणी अवघी बेधुंद असे गगन बरसले

पाउस धरती मीलन होता गर्भात तिच्या मोती विरले
तांबुस काळ्या भूमीवरती हरित कोवळे गवत प्रसवले

हिरवा शालू धरा नेसली अंगावरती खेळती फुले
लाल कोवळ्या वट पारंब्या जणू भासतो झोकाच झुले

© दीपक पटेकर {दीपी}
सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा