*पी.एम.किसानचा लाभ बांग्लादेशी नागरिकांना मिळाल्याने शिवसेना आक्रमक*
*जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शिवसेनेचे आंदोलन*
*शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला असून प्रशासनाने त्यांचे अर्ज वैध ठरवून सात सात हप्ते त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विरोधात व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.