You are currently viewing हाच का धर्म

हाच का धर्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा आजगाव साहित्य प्रेरणा कट्टाचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हाच का धर्म*

 

आधी पूर्वज जन्मले माझे ते

भेदाभेदरहित ओळख त्यांना |

अज्ञानाने सुसंस्कारा ये बाधा

विज्ञानाने मी उजळीन त्यांना ||१||

जन्मापासून अखेरपर्यंत

जीवन जगायचे संन्मानाने |

माझ्यासोबत अखेरपर्यंत

अन् माझ्यानंतरही संन्मानाने ||२||

मी असेन वा नसेन ह्या देही

अनंतरुपी तुम्हासोबत मी |

कुणी मोठं केलं मला ह्या देही

तुमच्यापायी तुम्हासोबत मी ||३||

विवेक नेती मला त्यांच्यापाठी

विवेकांना दिशा देतो त्यासाठी |

मी रेशीमगाठी बांधून घट्ट

माणसातल्या थोर देवासाठी ||४||

जात्यांतर धर्मांतर कोठले

मानवी देही भेद ना उरले |

जीवनारोग्य कसे जुळवले

काय अवयवा भेद नुरले ||५||

रक्तदान ते तनभागदान

जीवरक्षी ते कुणा दुःखितांचे |

जात धर्मात हो आधार दान

दुःख अपार कुणा दुःखितांचे ||६||

ज्या कुळी जन्मलो या मानवात

मानवी हिता सुखे गुंतवावे |

लाज वाटून का सोडणे त्यांस

हाच का धर्म त्यास अंतरावे ||७||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. : वेंगुर्ला,

जि. :- सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा