You are currently viewing पादाकुलक

पादाकुलक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसूरकर लिखित अप्रतिम भावगीत*

 

*पादाकुलक*

 

*नभांगणी हसले तारे*

 

नभांगणी ते हसले तारे

बोलल्याविना कळले सारे ॥धृ॥

 

दिसेल का रे तुझ्या मनाला

अश्रू धारा त्या नयनाला

संथ गतीने गेले वारे

बोलल्याविना कळले सारे ॥ १ ॥

 

तुझ्या प्रीतीचा सुगंध भरला

हृदयी पसरून तो दरवळला

डोले मनात मोर पिसारे

बोलल्या विना कळले सारे ॥ 2 ॥

 

तुला पाहता हास्य उमटले

गुलाब पुष्प गाली फुलले

तुझ्या मनाला मोहवणारे

बोलल्याविना कळले सारे ॥ ३ ॥

 

*🖊️© सौ आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा