सावंतवाडी
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सन २०२०च्या परीक्षेत जि.प. शाळा केर नं.१ चा विद्यार्थी कु. सौरभ प्रकाश देसाई यांने घवघवीत यश संपादन करून जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला. यापूर्वी तो गणित प्राविण्य परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम आला होता.
फरा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी आपले वडील कै. फटिराव रामचंद्र देसाई शिक्षण विस्तार अधिकारी तथा जि.प.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त यांच्या स्मरणार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या खासगी व शासकीय स्पर्धा परीक्षांना होणारा खर्च स्वतः करून मुलांना मदत व प्रेरणा दिली. कोरोना कालावधीत आतापर्यंत त्यांनी दोन वेळा प्रत्येक विद्यार्थ्यांला मास्क व सँनिटायजरचे वाटप केले व आवश्यकता भासल्यास पुन्हा देणार आहेत. शाळा गुणवत्ता वाढीसाठी त्यांचे हे कार्य विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना प्रेरणादायी ठरले. सौरभ शिष्यवृत्ती धारक ठरल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
सौरभचे आदर्श गाव केर चे सरपंच श्रीम. मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, पोलीस पाटील तुकाराम देसाई, प्रेमानंद देसाई, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. छाया बाळेकुंद्री, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा श्रीम.वैष्णवी खानोलकर उपाध्यक्ष प्रकाश देसाई, केंद्रप्रमुख सदाशिव पाटगांवकर तसेच आदर्श गाव केरच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
सौरभला त्याचे पालक, तसेच मुख्याध्यापक श्री सगुण कवठणकर, वर्गशिक्षक रामा गवस, अनिल ठाकर यांचे मार्गदर्शन लाभले.