*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*
*चला महाराष्ट्र घडवूया*
बघायला गेलं तर यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचे प्रमाण अपेक्षेपेक्षा बरेच आहेत. शालेय जीवनात आजकाल सर्वच विद्यार्थी यशस्वी होत आहेत. चांगले गुण मिळवून मेरीट ही घेत आहेत. परंतु, शालेय जीवन संपल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आवासून उभी राहतात. तिथेच विद्यार्थ्यांचा विश्वास डगमगायला सुरुवात होते. आणि त्यात आणखी पालकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा ही वाढीस लागतात. आणि मग विद्यार्थी जो पर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत ते अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊनच पुढील प्रवास चालू ठेवावा लागतो. पण एका विशिष्ट ठिकाणी तो विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या की स्वतःची स्वप्ने पूर्ण करायची यातच भरडला जातो. त्यात असते अभ्यासाचे टेंशन. आणि समोर असते सर्व विषय सुटण्याचे भले मोठे आव्हान. कसा तरी अभ्यास करून तो विद्यार्थी परीक्षेस उतरतो. होईल तितका चांगला पेपर लिहितो. पण, नशिबापुढे कोणाचेही काही चालत नाही म्हणतात तसे, चांगला पेपर लिहिलेला असून सुद्धा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागते. आणि मग सुरू होते एटिकेटीची वारी. म्हणजे प्रत्येक वेळेस जो पर्यंत विषय सुटत नाही तो पर्यंत परीक्षा देत राहा. आणि विद्यापीठाला हवे तेवढे पैसे कमावून द्या. त्यातही विद्यार्थ्यांची सर्व विषय सुटून निकाल लागल्यानंतर धावपळ असते ती पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची. आणि तिथे ही आले राजकारण, राजनीती, भ्रष्टाचार. मेरीटला नंबर लागत नाही म्हणून “एवढे डोनेशन द्या. आम्ही तुमचा प्रवेश निश्चित करून देऊ”. म्हणजे इथेही जाणारा असतो तो पैसाच. या गोष्टीमुळे जाणाऱ्या पैशाला पालक ही विद्यार्थ्यांवर वैतागतात. आणि विद्यार्थ्यांना ही पालकांच्या निर्माण होणाऱ्या संतापाच्या लाटांना चोख प्रत्युत्तर द्यावे लागते.
एवढे होऊन सुद्धा पुन्हा नव्या जिद्दीने त्या आव्हानाला विद्यार्थी सामोरे जातात. आणि अपयशातून यशाची उंची गाठत असतात. एवढ्या वरच विद्यार्थ्यांसमोर असलेली आव्हाने संपत नाहीत. तर त्यापुढे उभे असते एक भले मोठे नोकरीचे आव्हान. समोर उभी असलेली आव्हाने दिसत असताना सुद्धा ते विद्यार्थी केवळ जीवनात यशस्वी होण्यासाठी अतोनात झटत असतात, अतोनात जीवाची शर्थ करत त्या परिस्थितीस सामोरे जात असतात. पण नेहमी पदरी पडते ती निराशा. आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
आता शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोकरीसाठी बाहेर पडतात. जिथे तिथे आपला बायोडाटा घेऊन फिरत असतात. या कंपनीत जा, त्या कंपनीत जा, इकडे जा, तिकडे जा, इथे अप्लाय कर, तिथे अप्लाय कर. तरी शेवटी निकष त्याचा कुठेही लागताना दिसत नाही. मग विद्यार्थी वळतात ते ऑनलाईन नोकरीच्या शोधात. तिथे ही विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे षडयंत्र सुरूच. सुरुवातीला विद्यार्थी मोठ्या दिमाखात ऑनलाईन जॉब पोर्टलवर आपला बायोडाटा टाकत असतात. नंतर त्यांचा निवड झाल्याचा फोन आल्यावर विद्यार्थ्यांना जरासे हायसे वाटते ना वाटते तोच पुढचे वाक्य असते,”तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल, तर आमची प्रोसेसिंग फी एवढी एवढी द्यावी लागेल”. तिथेच विद्यार्थी अर्धा गळून जातो. हे असे कोणी प्रोसेसिंग फी मागतो, तर कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फी मागतो. ज्या वयात विद्यार्थ्यांना पैसे कमवायची गरज असते तिथे हे असे फ्रॉड कंपन्या विद्यार्थांच्या उरावर बसतात. शेवटी या सगळ्या जाचाला कंटाळून विद्यार्थी पुन्हा नोकरीसाठी बाहेर पडतो. चांगल्या चांगल्या कंपन्यांत मुलाखती देतो. तिथे ही विद्यार्थ्याने “फ्रेशर आहे” असे सांगितले की समजून घ्यायचे की आपला पगार अर्धा होणार. बरं, त्या मिळणाऱ्या पगारातून पेट्रोलचा खर्च सोडला तर स्वतः पुरता खर्च देखील भागणारा नसतो. त्या कंपन्यांना अनुभवी तज्ञ, अनुभवी विद्यार्थी कामासाठी पाहिजे असतात. पण जर फ्रेशर्स विद्यार्थ्यांना कोणी नोकरी दिलीच नाही तर त्यांना अनुभव कसा मिळणार? आणि ते विद्यार्थी अनुभवी कधी, कसे होणार? एवढे साधेसे गणित कंपन्यांतील लोकांना न कळावे.
प्रत्येक विद्यार्थ्याचे, स्वप्न असते आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, निदान एवढे तरी पैसे हातात यावे की ज्याने आपण स्वतःचा खर्च तरी आईवडिलांवर अवलंबून न राहता स्वतः करू शकू. परंतु, बाहेरची ही अशी परिस्थिती पाहता ते स्वप्न ही लवकर पूर्ण होत नाही. मग शेवटचा पर्याय उरतो तो फक्त सरकारी नोकरीचा.
आता सरकारी नोकरी करायची म्हणजे परत समोर अभ्यासाचं टेन्शन, परीक्षांचं टेन्शन, त्या सरकारी नोकरीच्या परीक्षेत इतर प्रतिस्पर्धीमध्ये आपला क्रमांक लागतो की नाही व त्या स्पर्धेत आपण टिकून राहतो की नाही याची सर्वात मोठी चिंता. बरं, त्या सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षा पण इतक्या सोप्या नाही की उठ सुट कोणी येईल आणि पास होईल. हो. काही विद्यार्थ्यांची अभ्यास न करता, काही न करता, अंदाजे उत्तरे देऊन सरकारी नोकरीसाठी निवड होते. पण काहींच्या बाबतीत कितीही अभ्यास केला, आणि कितीही स्पर्धा परीक्षा दिल्या तरी नशिबात मेहनत व अपयश च लिहिलेलं असतं. शेवटी म्हणतात ना नशीबाची ऐशी तैशी ते हेच.
बरं. हे राजकारणी सदस्य पण फक्तं निवडणुका आल्यावर च जागर होतात. आणि मत मागण्यासाठी एकावर एक आश्वासने यांची सुरू होतात. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, हे ते. एकंदरीत मग आता या आयुष्याचे आव्हान पेलण्यासाठी एका अशा अमृताची गरज भासत आहे जसे संत ज्ञानेश्वरांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे “परि अमृतातेही पैजास जिंके”. त्या अमृताने जगातील सर्व तरुण मंडळी देशोधडीला लागतील, जसे “तिमिरातून तेजाकडे” प्रकाश त्यांचा परावर्तित होईल. वरील सर्व घटनांचा आढावा घेता चालणाऱ्या परिस्थितींवर मात करण्यासाठी आजच्या तरुण वर्गालाच पुढे येण्याची काळाची गरज आहे. आणि त्यासाठी गरज आहे ती “युवा समितीची” आता तुम्ही म्हणाल युवा समिती तयार करून याने प्रश्न कसे सुटतील? हो. त्याचे ही उत्तर माझ्याकडे आहे. बघा ते कसे?
१) प्रत्येक गावातील, प्रत्येक शहरातील सर्व तरुणांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
२) तरुणांमध्ये एकी निर्माण झाली की त्यातून ते एका राजकारणी नेत्याचे किंवा नगरसेवकाचे साहाय्य घेऊन त्या गावापुरती किंवा त्या शहरापूर्ती एक युवा समिती गठीत होईल.
३) विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या समस्या या समितीपुढे मांडण्यासाठी एक युवा समितीमार्फत ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल.
४) ऑनलाईन पोर्टल वरून ज्यांनी ज्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून एक ठराविक वेळेनुसार एक अर्ज तयार करून त्यावर सर्व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन संबंधित विद्यापीठाच्या कार्यालयात किंवा त्या संबंधित महाविद्यालयाच्या कार्यालयात दाखल केला जाईल.
५) आणि तरीही आपल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, समस्या दूर झाल्या नाहीत तर नायलाजस्त्व युवा समितीतील सर्व विद्यार्थी, साहाय्य घेतलेले नेते मंडळी व ज्यांनी समस्येचे निराकरण होण्यासाठी नोंदणी केलेली आहे असे सर्व विद्यार्थी मिळून त्या विद्यापीठात त्या महाविद्यालयात जाऊन जन आंदोलने, मुक आंदोलने करण्याशिवाय तरणोपाय राहणार नाही.
६) यातूनच दर वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार ही उपलब्ध करून दिला जाईल.
एवढे केल्यानंतर नक्कीच शिक्षण व्यवस्थेमध्ये आपणाला हवा तसा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. “जर असेल साऱ्यांची साथ, तर कशाला उद्याची बात” म्हणातात तसे तरुणांमध्ये एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तरुणाने पुढे यावं, व प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विभागात नेते मंडळींची मदत घेऊन आपली एक युवा “समिती स्थापन” करावी. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर या युवा समितीचा एक गट असावा म्हणजे तिथे चालणाऱ्या भ्रष्टाचारावर आळा बसेल. महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर एक “युवा समिती” स्थापन करावी तसेच नोकरीच्या बाबतीत रोजगार हमी योजना अंतर्गत एक युवा समिती स्थापन करावी जी पुढे येणाऱ्या सर्व नवं तरुणांचे स्वप्ने पूर्ण करतील. युवकांच्या प्रयत्नांना बळ देतील. सर्व तरुणांच्या इच्छा आंकांक्षा आनंदाने फेर धरून नाचू लागतील. त्यांचे आर्थिक, सामाजिक प्रश्न मार्गी लागतील, सर्वांना चांगल्या रीतीने रोजगार उपलब्ध होईल. शिक्षणाच्या अडचणीतून ही मुक्ती मिळेल. प्रवेश प्रक्रियेत होणारा अडथळा ही दूर होईल. तसेच सर्व तरुणांचे आयुष्य ही सुकर होईल. आणि अर्थातच नोकरी मिळाली म्हणजे छोकरी मिळायला ही अधिकसा वेळ लागणार नाही. तेव्हा चला या युवा समितीच्या कार्यास सुरुवात करू, महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करून महाराष्ट्र अधिक गतिमान करू. पटतंय ना! एक पाऊल प्रगतीकडे.
लेखक : नयन धारणकर, नाशिक
8275838083
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————