You are currently viewing मळगाव सातपाटा परिसरात मारूती ८०० कारने घेतला अचानक पेट

मळगाव सातपाटा परिसरात मारूती ८०० कारने घेतला अचानक पेट

मळगाव सातपाटा परिसरात मारूती ८०० कारने घेतला अचानक पेट

सावंतवाडी

मळगाव सातपाटा परिसरात मारूती ८०० कारने अचानक पेट घेतला. यात गाडी पूर्णता जळून खाक झाली. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
यात एक प्रेमीयुगुल होते.आग लागल्याचे लक्षात येताच माहीती न देताच त्या दोघांनी तेथून पळ काढला.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दाखल नाही असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मळगाव सातपाटा परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. त्या गाडीत असलेल्या युवकाने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखत सावंतवाडी पालिकेच्या बंबाला पाचारण केले. काही वेळाने त्या ठिकाणी आलेल्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली .हीच संधी साधून गाडीत असलेल्या प्रेमी युगुलाने तेथून पळ काढला.
गाडीला नंबर नसल्यामुळे ती नेमकी गाडी कोणाची हे कळू शकले नाही याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गाडी जळल्याचे कळाले परंतु आमच्या पर्यंत कोणी आले नाही नेमकी गाडी कोणाची? याचा आम्ही शोध घेत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा