देवगड
मुणगे येथील भगवती हायस्कूल तिठा येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून त्यांनी आपल्या निधीतून मंजूर झालेल्या सौर हायमॅक्स दिव्याचे भूमिपूजन सरपंच सौ साक्षी गुरव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सदर ठिकाणी हायमॅक्स दिवा बसविण्यात यावा अशी गावच्या वतीने गेले चार-पाच वर्षे ग्रामस्थांतून मागणी केली जात होती. यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक वेळ मागणी करून याबद्दल ठरावही घेतले होते. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व मुणगे सोसायटीचे चेअरमन गोविंद सावंत, सरपंच सौ साक्षी गुरव यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. आमदारांनी या हायमॅक्स दिव्यासाठी ४ लाख ९० हजाराचा निधी मंजूर करून दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांना दीर्घायुष्य लाभो व मुणगे गावातील विकास कामांसाठी असाच भरघोस निधी त्यांच्या माध्यमातून मिळत राहो अशी भगवती चरणी प्रार्थना गोविंद सावंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली. वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोलर हायमॅक्स दिव्याचे भूमिपूजन मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत उपसरपंच संजय घाग, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सावंत, राजु पुजारे, प्रकाश सावंत ,अजित रासम, आशिष अहिर, सुनील बोरकर, श्रीमती प्रभात सावंत ,श्री बागवे तसे ठेकेदार श्री शेख आदीं उपस्थित होते.