सावंतवाडी शहराच्या सुरक्षेसाठी घेतली जबाबदारी
सावंतवाडी
सावंतवाडी शहराच्याच् सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे. या टिमच्या माध्यमातून शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती द्वारे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करून तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचे विनामूल्य सेवाभावी कार्य या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी कौतुक केले असून यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत शासनामार्फत सामाजिक बांधिलकीला केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, समीरा खलील, हेलन निबरे, शामराव हळदणकर ,शेखर सुभेदार व रवी जाधव उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे तसेच इतर आपत्कालीन परिस्थीतीमूळे सावंतवाडी शहरामध्ये कुठेही कोणतीही घटना घडल्यास सामाजिक बांधिलकीची ही टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विनामूल्य मदत कार्य करणार आहे, अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली आहे. या टीमच्या संपर्कासाठी रवि जाधव (9405264027 ) संजय पेडणेकर (7020812719 ) शेखर सुभेदार (9423753042 ) समीरा खलील (9890714614 )
या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.