You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ६० रक्तदात्यांचे रक्तदान

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ६० रक्तदात्यांचे रक्तदान

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ६० रक्तदात्यांचे रक्तदान…!

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १२० रिक्षा चालकांनी घेतला लाभ…!

रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे बक्षिसे…!

कणकवली

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपच्यावतीने येथील लक्ष्मीविष्णू हॉल येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर मोफत आरोग्य शिबिराचा १२० रिक्षा चालकांनी लाभ घेतला. रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे बक्षिसे दिली गेली. यामध्ये प्रथम अमित पाटील (वॉशिंग मशीन), द्वितीय संदेश परुळेकर (ओव्हन) तर तृतीय मिथुन ठाणेकर (गॅस शेगडी) व प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

या उदघाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, संचालिका प्रज्ञा ढवण, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, किशोर राणे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, शिशिर परुळेकर, अजय गांगण, अभय राणे, चारुदत्त साटम, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, सुशील पारकर, संतोष सावंत, समीर प्रभुगावकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. प्रिती नायगावकर, डॉ. प्रियांका चिवटे, डॉ. धनंजय रासम, डॉ. जी. बी. शेळके, डॉ. जगदाळे, डॉ. नागनाथ धर्माधिकारी, तालुका उपाध्यक्षा संजना सदडेकर, शहराध्यक्षा प्राची कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लकी ड्रॉ स्पर्धेचे बक्षीस वितरण खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा