You are currently viewing मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या निधीतून गोविंद भोसले यांच्यावरील खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या निधीतून गोविंद भोसले यांच्यावरील खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या तत्परतेने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या निधीतून गोविंद भोसले यांच्यावरील खुब्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. याबद्दल त्यांनी व त्यांच्या कुटूंबाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे आभार मानले आहेत.

येथील गोविंद भोसले यांना खुब्याचा खूप त्रास जाणवत होता. या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी दवाखान्यामध्ये सुमारे साडे ७ लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. परंतू, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते हा खर्च पेलू शकत नव्हते.

ही बाब शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून गोविंद भोसले यांची खुब्यावरील शस्त्रक्रिया मोफत करून देण्यास मदत केली. या मदतीबद्दल गोविंद भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील माने व शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा