You are currently viewing सावंतवाडी रक्तपेढीतील “टेक्निशियन” पद तात्काळ भरा, अन्यथा आंदोलन – देव्या सुर्याजी

सावंतवाडी रक्तपेढीतील “टेक्निशियन” पद तात्काळ भरा, अन्यथा आंदोलन – देव्या सुर्याजी

सावंतवाडी रक्तपेढीतील “टेक्निशियन” पद तात्काळ भरा, अन्यथा आंदोलन – देव्या सुर्याजी

सावंतवाडी

येथील कुटीर रुग्णालयातील रक्त पेढीत टेक्निशियन पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे रिक्त पद तात्काळ भरा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देव्या सुर्याजी यांनी दिला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढीत एक-दोन नव्हे तर आठ टेक्निशियन आहेत. मात्र सावंतवाडीत दोघेच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सावंतवाडीतील रक्तपेढी बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप ही त्यांनी केला आहे.

याबाबत श्री.सुर्याजी यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, सध्यस्थितीत केवळ दोन जणांच्या जीवावर ब्लड बँक सुरू आहे. दिवसाला रक्ताची गरज या ब्लड बँकेतून भासत आहे. रक्तदाते सामाजिक भान ठेवत रक्तदान करत आहे. असं असतांना देखील प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज करून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत ८ टेक्निशियन आहेत. मात्र, सावंतवाडीत दोघेच काम करत आहेत. त्यातील एक रजेवर आहे. त्यामुळे एकावरच सर्व भार पडत आहे. रक्तदान शिबीरासाठी देखील त्यांना गावागावात जावं लागतं आहे. ४८ तास एक कर्मचारी काम करत आहे. त्यातील हा कर्मचारी ही महिला असल्यानं त्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे गरजेचा वेळी रक्तपेढीत कर्मचारी उपस्थित नसतो. याचा रूग्णांच्या नातेवाईकांना फटका बसत असून रूग्णांच्या जीवावर बेतत आहे. यास्तव येत्या सोमवार पर्यंत ब्लड बँकमधील रिक्त पदे न भरल्यास रुग्णालयासमोर बसून काळी फीत बांधून वैद्यकीय प्रशासनाचा निषेध करत तीव्र आंदोल छेडलं जाईल संभाव्य परिस्थितीला जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य प्रशासन जबाबदार राहतील, असा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा