इचलकरंजी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांत सर्वसामान्यांपासून उद्योजक, व्यापारी, महिलांसाठी अनेक हितकारी योजना राबवल्यात. भ्रष्टाचारमुक्त सुशासन देण्याचा प्रयत्न केला. आता सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या दूरदृष्टी विचारांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करावे, असे आवाहन भाजपचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केले.
इचलकरंजी शहर भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी 9 अंतर्गत येथे सोशल मिडिया संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. धनंजय पवार यांनी सोशल मिडीयाचे फायदे-तोटे तसंच त्यांच्या आयुष्यात आलेल्या घटनेचा संदर्भ देत सोशल मिडीयाचे महत्त्व विषद केले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या अनेक योजना सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सद्या समाजातील प्रत्येक घटकांवर सोशल मिडीयाचं प्रभुत्व असल्याने समाजात घडणार्या प्रत्येक घडामोडी सोशल मिडीयावरून व्यक्त होतात. प्रामुख्याने राजकारणात सोशल मिडीया हा प्रमुख घटक बनला आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत राबवलेल्या अनेक हितकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहोचवण्याबाबत मार्गदर्शनही केले. कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष सतीश पंडित, सोशल मिडीया प्रमुख सिद्धलिंग बुक्का, अमृत भोसले, रणजित अनुसे, किसन शिंदे, रामसागर पोटे, प्रवीण पाटील, पुनम जाधव, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, शुभम बर्गे, राजेंद्र पाटील, प्रमोद बचाटे, प्रदीप माळगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.