कणकवली
फेब्रुवारी 2020 मध्ये घ्येण्यात आलेल्या प्राथमिक (इ.5 वी.) व पूर्व माध्यमिक (इ.8वी.) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश प्राप्त केले आहे.
कु. पार्थ मोहन मोदी याने 236 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त केली व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आणि तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.
इ. ५ वी. मधील कु. सृष्टी सुखासरे (224 गुण) व कु. समर्थ कुंभार (216 गुण) प्राप्त करून त्यांना ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी ) परीक्षेमध्ये प्रशाळेतील ५ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. त्यामध्ये
कु. अनुष्का मनिष गांधी हिने २४४ गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक व तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
तसेच चिन्मय दिलीप शेळके या विद्यार्थ्याने १८६ गुण, अथर्व प्रसाद पारकर या विद्यार्थ्याने १८० गुण, हर्षदीप डावरे याने १६८ गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, स्कूल कमिटीचे चेअरमन, खजिनदार तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांच्या पुढील उज्जवल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.