*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वारी चालली पंढरी..*
वारी चालली पंढरी नि वारी चालली पंढरी
तेथे भेटतो श्रीहरी नि तेथे भेटतो श्रीहरी…
जयजय रामकृष्ण हरी.. जय जय …
पंढरीत विटेवरी उभा श्रीरंग
भक्तजन सारे भजनात दंग
टाळ मृदुंगाचा नाद चाले भीमा तीरी..
वारी चालली पंढरी नि वारी ….
जयजय रामकृष्ण हरी ..
नाम घेता देवा तुझे फिटतात पापे
कळीकाळ देवा तुला थरथरा कापे
वैष्णवांचा वाली तू अर्धनटनारी …
वारी चालली पंढरी…नि वारी
जय जय रामकृष्ण हरी..
भेटी लागी देवा आता लागलीसे आस
भास होई तुझा मला सदा आसपास
शेतशिवारात तुझा बांधबांध भारी…
वारी चालली पंढरी नि वारी…
जय जय रामकृष्ण हरी…
आवतन दे ना देवा धावत येईन
श्रीमुख देवा तुझे आवडी पाहिन
पुण्यकर्म नाही माझे पापे तू निवारी..
वारी चालली पंढरी.. नि वारी…
जय जय रामकृष्ण हरी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २० जून २०२३
वेळ रात्री : ११/१७