सावंतवाडी
येथील विधानसभा मतदार संघ गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यातच आहे. त्यामुळे आमची जागा आमच्याकडे राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. खासदार विनायक राउत यांनी केलेल्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केला. त्यांनी फक्त ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास घारेंना मदत करू असे, सांगितले अशी स्पष्टोक्ती ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी आज येथे मांडली.
दरम्यान शिक्षणमंत्री पद असताना सुध्दा दिपक केसरकर हे जिल्ह्यासाठी काहीही करू शकलेले नाहीत. त्यांनी डी.एड बी.एड लोकांना खास बाब म्हणून शिक्षण प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा पुन्हा त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आज सावंतवाडी खोके आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पडते बोलत होते यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख रुपेश राउळ, बाबूराव धुरी, बाळू परब, मायकल डीसोझा, बाळा गावडे, भारती कासार, गुणाजी गावडे, आबा सावंत, शब्बीर मणीयार, अजित राउळ, राजू शेटकर, संदेश केरकर, विनोद काजरेकर,रोहन माळकर, संदिप पांढरे, विनोद काजरेकर, रमाकांत राउळ, पुरूषोत्तम नाईक, सुनिल गावडे, नामदेव नाईक, बाळू गवस, सुरेश पास्ते, संजय गवस, मिलींद नाईक, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, मनाली परब, कल्पना नाटेकर, लक्ष्मी तळकटकर, आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पडते याठीकाणी म्हणाले आमदार दिपक केसरकर यांनी शिवसेनेचा घात करुन शिंदे गटाशी सलगी केली आहे. त्यामुळे आजच्या खोके आंदोलनात त्यांचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी आज जरी मंत्रीपद स्विकारले असले, तरी त्यांनी आपल्या पदाला साजेसे काम केेलेले नाही. या ठीकाणी शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे काही झाले तरी येथील जनता त्यांना माफ करणार नाही. मंत्री झाल्यानंतर आपण जिल्ह्याच्या विकास करू असे, केसरकर यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र दोनदा मंत्री होवून सुध्दा घोषणा पलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. अनेक प्रश्न तसेच प्रंलबित आहेत. त्यामुळे येणार्या निवडणूकीत त्यांना जनताच धडा शिकवेल असे, त्यांनी सांगितले.