You are currently viewing ‘क्रीडा पत्रकारिता’ हे आज स्वतंत्र कार्यक्षेत्र: दत्तात्रय मारकड

‘क्रीडा पत्रकारिता’ हे आज स्वतंत्र कार्यक्षेत्र: दत्तात्रय मारकड

*’क्रीडा पत्रकारिता’ हे आज स्वतंत्र कार्यक्षेत्र:* दत्तात्रय मारकड

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मार्फत आयोजित क्रीडा शिक्षक शिबिरात प्रतिपादन*

तळेरे: प्रतिनिधी

क्रीडा मार्गदर्शकाबरोबरच प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकांनी ‘क्रीडा पत्रकारितेचाही’ छंद जोपासावा, आजच्या काळात’ क्रीडा पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक दैनिकात आज क्रीडा वृत्तासाठी किमान एक संपूर्ण पृष्ठ राखून ठेवण्यात येत असून.क्रीडा शिक्षकांनी विविध खेळांच्या प्रचार -प्रसाराठी तसेच खेळाडुंची प्रतिभा उंचावण्यासाठी बातम्याच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी सावंतवाडी येथील क्रीडा शिक्षकांच्या शिबिरात केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत यशवंतराव भोसले तंत्र शिक्षण महाविद्यालय,सावंतवाडी येथे आयोजित ‘ जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित ‘जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात प्रमुख वक्ते म्हणून दत्तात्रय मारकड बोलत होते.
“क्रीडा पत्रकारिता”या विषयावर बोलताना दत्तात्रय मारकड पुढे म्हणाले की, मराठी पत्रकारितेचा इतिहास अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरु झाल्याचा सांगून त्यांनी विविध खेळांच्या विविध आशयाच्या बातम्या कशा लिहिल्या जातात या संदर्भात याप्रसंगी सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रमुख वक्ते दत्तात्रय मारकड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी व्यासपीठावर तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, या शिबिराचे तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र घावरे, पंकज राणे अजिंक्य पोकळे,अमित भाटकर व जयश्री कसालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला माध्यमिक शाळेतील सुमारे 60 पेक्षा अधिक क्रीडा शिक्षक 15 जून पासून प्रशिक्षण घेत आहेत, तर दि. 22 जून रोजी या प्रशिक्षणाचा सांगता समारंभ होणार आहे.
याशिवाय सोमवारी सकाळच्या सत्रात बुद्धिबळ खेळाचे मार्गदर्शक व संघटनेचे पदाधिकारी श्रीकृष्ण आडेलकर यांनी तर त्यांनंतर ‘आट्यापाट्या’ या खेळाचे मार्गदर्शन कासार्डे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा आट्यापाट्या संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय मारकड यांनी यांनी केले.
मार्गदर्शन शिबिराला उपस्थित मान्यवर वक्त्यांचे स्वागत रामचंद्र घावरे यांनी करून शेवटी आभार मानले

१)सावंतवाडी येथील जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते दत्तात्रय मारकड सोबत, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे रामचंद्र घावरे व अन्य मान्यवर

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा