You are currently viewing करा योगा..रहा फीट..

करा योगा..रहा फीट..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्य तथा लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांनी योगादिनानिमीत्त लिहिलेला अप्रतिम लेख…*

*करा योगा..रहा फीट..!*

योगा ही एक जीवनपद्धती आहे. योग म्हणजे जोडणं.
मन आणि शरिर यांचं शिस्तबद्ध संयुक्तीकरण!
प्रत्येकाच्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे ,किंबहुना ते असले पाहिजे.
खरं म्हणजे योगाशी माझी ओळख फार लहानपणीच झाली.. माझे वडील योगाभ्यासी होते. ते कुटुंबातील
सर्वांनाच योगासने शिकवत. प्राणायामाचे महत्व
बिंबवण्याचा प्रयत्न करत.
शाळेत असतानाही फिजीकल ट्रेनींगच्या माध्यमातून
योगाची ओळख झाली. पण गंमत अशी असते लहानपणा
पासुन तो आपल्या जीवनाचा भाग नाही होऊ शकत.
तो फक्त इतिहास भूगोला सारखा एक तास असतो!
पण मग मोठे झालो.आयुष्यातल्या स्पर्धा वाढल्या .
चिंता ,जबाबदार्‍या वाढल्या .यश अपयश .आशा निराशांचे वादळ ऊठले .प्रचंड तणावयुक्त झाले जीवन!
कळतनकळत शरिरावर त्यांचे परिणाम दिसू लागले.
आणि मग डाॅक्टरच्या फेर्‍या ,औषधे गोळ्या ,आहारबंधने यांनी जीवन व्यापुनच गेले!
तेव्हां खरी पतंजली योगाने साथ दिली.
योगेन् चित्तस्य पदे न वाचा
मलम् शरीरस्य नच वैद्यकेन्
योपा करत्वम् प्रवरम् मुनीनाम्
पतंजलीम् प्रांजलीरान् तोषमी।।
हा जीवन मंत्र बनला.योगा हा जीवनाचा आवश्यक भाग
बनला. ती एक जीवनपद्धती बनली.
निरनिराळी आसने जशी की, ताडासन, हस्तपादासन.,
धनुरासन भुजंगासन ब्रह्ममुद्रा वगैरे आसनातून शरिराला शिस्तबद्धता आली. जडत्व, काठिण्य नाहीसं झालं! सूर्यनमस्कारामुळे शरिरातली ऊर्जा वर्धित झाली.
नकळतच वेदना व्याधी कमी झाल्या.
प्राणायाम केल्याने,शवासनाने तणावावर नियंत्रण आले.आणि
जीवन आनंदी बनले! शरीर आणि मन यांच्या संतुलनामुळे विचारात सकारात्मकता आली.षड्रिपुंचं
साम्राज्य विरु लागलं .चित्त स्थिर झालं एकात्मकता वाढली.त्यामुळे कार्यक्षमता वाढली.योगाचे असे चौफेर
फायदे मी प्रत्यक्ष अनुभवले..अनुभवत आहे.

फक्त “योगा दिन” साजरा करण्यापुरते त्याचे महत्व
नसावे तर योगा ही आपली जीवनपद्धती बनली पाहिजे!
योगा ही हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे .ती टिकवली पाहिजे.
जमेल तसे ,जमेल तेव्हढे अन् जमेल तेव्हां पण रोज
नित्यनियमाने योगाभ्यासाचा अनुभव घ्यावा!!
करा योगा रहा फिट…..!!!

धन्यवाद!
सौ.राधिका भांडारकर
पुणे.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा