*”न्यूज स्टोरी टुडे” वेब पोर्टल ठाणे जिल्हा ब्युरो चीफ तथा दै. ठाणे वैभवचे पत्रकार, स्तंभलेखक ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती…….!*
लांडग्यांचा कळप
कोल्ह्यांची झुंड
तरसाच्या येरझाऱ्या
शिकारी कुत्र्यांचे भुंकणे
यामधून ती कशी बर चालते
तिच्यावर चित्ता झेपावतो
बिबट्या वास घेतो
वाघ रक्त पिऊ बघतो
अस्वल ओरबाडतो
ते सार काही ती सोसते
बोके तिच्यावर गुरगुरतात
उंदरं आतून कुरतडतात
साप नको तिथे डंख मारतात
विंचू तिथेच टोचतात
तरी ती का म्हणून मौन पत्करते
ती हरणी जीव घेऊन पळते
गाय होऊन शांत बसते
शेळी होऊन मनात ब्यां… करते
मेंढी होऊन लोकर कातरून देते
आपली अशी अवहेलना का ती करते
ती उंटासारखी जिद्दी का होत नाही
घोड्यासारखी चपळ का धावत नाही
हत्तीसारखे बलाढ्य आरमार का बाळगत नाही
वनस्त्रीसारखी झहरी का होत नाही
तिने सवाल करुन जवाब मागायला हवा.
यातून तिच्यावर जुलूम, जबरदस्ती
शारीरिक, मानसिक अत्याचार होणार नाहीत
समाज बघ्याची भूमिका घेणार नाही
म्हणून तिने आता संघर्ष करायला हवा
तिच्यातल्या तिला जगण्यासाठी
अँड. रुपेश पवार
9930852165