बांदा
मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना योग दिन व विद्यार्थ्यांच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्व याविषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगासने करावीत असे आवाहन त्यांनी केले.
सहशिक्षिका प्राची परब यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करुन घेतली. योगासने करताना मनाची एकाग्रता व नियमितपणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. नर्सरी ते चौथी इयत्तेमधील सर्व विद्यार्थी योगाभ्यासाच्या वर्गात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, तेजस्वी गावडे, प्राची परब व पालक उपस्थित होते.