You are currently viewing सावंतवाडीचा पुढचा आमदार याच व्यासपीठावरच असणार – अमित सामंत

सावंतवाडीचा पुढचा आमदार याच व्यासपीठावरच असणार – अमित सामंत

चांगल्यासाठी सगळे एकत्र येतात हे सिंधुदुर्गातच घडू शकते…

कुडाळ

राजकारणात कोण कुठे असेल काही सांगता येणार नाही पण सावंतवाडीचा पुढचा आमदार याच व्यासपीठावरच असणार, असा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांंनी आज येथे केला.यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसाला उपस्थित राहणार्‍या सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. राजकारणात वैर असते मात्र चांगल्या गोष्टीसाठी सगळे एकत्र येतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात हे सिंधुदुर्गातच घडू शकते, असे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांचा वाढदिवस आज कुडाळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आता राजकारणात कोण कुठे असते सांगता येत नाही. रात्रीत पक्ष बदलणारे अनेक जण आहेत. परंतूू या ठिकाणी उपस्थित असलेल्या पैकी एक व्यक्ती सावंतवाडीचा आमदार असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, संदेश पारकर, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अनंत पिळणकर, बावतीस फर्नाडीस, अतूल बंगे, पुंडलिक दळवी, सावली पाटकर, इफ्तिकार राजगुरू, प्रफुल्ल सुद्रीक, अशोक पवार, बंड्या मांडकुलकर, देवा टेमकर, हीदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा