You are currently viewing बांदा केंद्र शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बांदा केंद्र शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बांदा

आजच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्य समतोल ठेवण्यासाठी योग ही काळाची गरज आहे .योगाची जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २१जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चालू वर्षी नववा आंतरराष्ट्रीय योग
दिन केंद्र शाळा बांदा नं.१येथेही स्काऊट गाईड व बांदा पतंजली योग समितीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

या दिवशी पतंजली योग समिती बांदा येथील जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर,बांदा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, केंद्र प्रमुख संदीप गवस,पतंजली योगसाधक राजश्री तेंडले , स्नेहा धामापूरकर, अल्पिता गाड,साक्षी धारगळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांकडून सूक्ष्म व्यायाम, विविध प्रकारची आसने‌, प्राणायाम यांची माहिती देऊन व प्रात्यक्षिक करून घेण्यात आली.

योग दिवस यशस्वी पार पाडण्यासाठी स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील , पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,स्नेहा घाडी, शांताराम असनकर, रंगनाथ परब,, शुभेच्छा सावंत,रसिका मालवणकर, जागृती धुरी,मनिषा मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा