*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*
*आंतरराष्ट्रीय योग दिवस*
योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे. योग या शब्दाचा अर्थ ‘जोडणे, एकत्र आणने, या जुळवणे असा आहे.
योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये – महाभारत, उपनिषद, पतंजलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये आढळतात.
योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, हिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले.
*महर्षि पतंजलि* हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत. महर्षि पतंजलिंनी योगचा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, ते खालील प्रमाणे आहेत:
१)यम, २)नियम, ३)आसन, ४) प्राणायाम, ५)प्रत्याहार, ६)धारणा, ७)ध्यान आणि ८) समाधी ही योगाची आठ अंगे आहेत.
भारतीय योगशास्त्रा मध्ये योगाचे पाच प्रकार सांगितले आहेत.
१)ज्ञानयोग — आत्मज्ञान
२)हठयोग — आसन आणि कुंडलिनी जागृति
३)कर्मयोग — योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)
४)भक्तियोग — भजनं कुर्याम्
५)राजयोग — योगः चित्तवृत्तिनिरोधः (मनाच्या की वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)
योगावर पतंजली मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते .
योगा म्हणजे काय?
योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या अनेक संकल्पना भारतात पूर्वीपासून प्रचलित आहेत. अध्यात्मिक क्षेत्रात विशेष गती करावयाची असल्यास योगा दृष्टीचा विचार आणि आचार अवलंबला जातो.
योगा म्हणजे एकात्मता, एकता, एकात्मिकता अशा विविध संकल्पना देखील योगाबद्दल सांगता येतील. सर्व सजीवसृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा होय.
मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्थिती योग दृष्टीने प्राप्त होऊ शकते. भारतात योगज्ञान फार प्राचीन काळापासून उपलब्ध आहे. अध्यात्मिक प्रक्रियेचा एक विशेष भाग म्हणून योगा या संकल्पनेचा उपयोग केला जातो.
योगामध्ये विविध योग सूत्रांचा व अष्टांग योगचा वापर केला जातो.
जागतिक योग दिन – २१ जून
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना मांडला.
एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी ११ डिसेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्तावाला सविस्तर चर्चेनंतर 3 महिन्यांनी संपूर्णपणे बहुमताने मान्यता प्राप्त दिली. आणि २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. त्यानंतर जगभरात दरवर्षी २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जातो.
योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.
जागतिक योग दिनाचे महत्त्व :-
मानवी जीवनात शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरांवर योगाने विकास घडवून आणता येतो. शरीर व मन निरोगी व प्रसन्न होऊन मानव सकारात्मक विचार करू लागतो. त्याचा प्रत्यय जे लोक योगा करतात त्यांना आलेला असतो. आणि असेच लोक योगाभ्यास व योगप्रचार करून समाजाला योग साधना करण्यास प्रवृत्त करतात.
संपूर्ण जगभरात योगप्रचार झाला तर मानवतेला भारत देश आणि योगा जीवन पद्धती ही सकारात्मक आणि शांततापूर्ण जीवनासाठी सहाय्यक ठरू शकेल.
*२१जून* हा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होत असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे याच दिवशी योग दिन साजरा होत असल्याने त्याचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्य वाढले आहे.
जागतिक योग दिन साजरीकरण:-
संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवन पद्धती अंगिकारण्याचे आवाहन केले जाते. जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी शरीर व मन योगयुक्त बनवले जाते. त्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व या दिवशी समजावून सांगितले जाते.
योग दिनाची माहिती सर्वांना व्हावी व त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी अशा उद्देशाने योग दिनाचे महत्त्व प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले जाते. सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून योग दिनाचे संदेश सर्वत्र पोचवले जातात.
योगचिकित्सा, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबींची माहिती सर्वांना व्हावी त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी योगाची व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जातात.
योगा केल्याने फक्त आपले शरीरच निरोगी राहत नाही तर योगा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. या करता सर्वांनी नियमित सकाळी किवा संध्याकाळी योगासने व प्राणायाम करायलाच हवीत.आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आज सूरू केलेला योगाभ्यास सतत करून जीवन सुखद व निरोगी ठेवावे. भारतीय योग संस्थान (पंजी) रोहिणी सेक्टर ३ नवी दिल्ली या संस्थेचा नारा * जीओ और जीवन दो* म्हणजे स्वतः जगा आणि दुसऱ्यांना ही जगवा हाच उद्देश धरून कार्य करत आहे. पुजनीय कै. श्री प्रकाश लालजी नी सुरू केलेली संस्था आज भारत देशात व परदेशात ही बऱ्याच ठिकाणी नि.शुल्क सेवा देण्याचे कार्य गेल्या पन्नास वर्षाहून अधिक वर्षे योगाभ्यास सेवा देत आहे. मी या संस्थेची एक प्रधान या नात्याने संस्थेला जोडले आहे ह्याचा मला अभिमान आहे.
आज २१ जून एक दिवस योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. करा योगा रोज आणि रहा निरोगी.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
२१/०६/२९२३ 🙏🙏🌹
शोभा वागळे
मुंबई
8859466717
*संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
———————————————-