डीकेटीईच्या १८ विद्यार्थ्यांची इटूओपन कंपनीत निवड
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याअंतर्गतच इटूओपन या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्हयूव आयोजित केला होता. या इंटरव्हयूवमध्ये डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील १८ विद्यार्थ्यांची आठ लाख पॅकेजवर निवड झाली आहे.
इटूओपन कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिका टेक्सास येथे असून, दूरसंचार, सॉफटवेअर, संगणक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही कंपनी सेवा देत आहे.
सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्याचा दबदबा आहे व कॅम्पस इंटरव्हयूव ही आजच्या शैक्षणिक जिवनातील अत्याआवश्यक बाब बनली असून त्यासाठी लागणारी ऍप्टीटयूड टेस्ट तसेच सॉफ्ट स्कील या सर्व बाजूंची डीकेटीईमध्ये योग्य तयारी करुन घेतली. याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये दिसत असून यावर्षी इटूओपन या आयाटी क्षेत्रातील नामांकित कंपनीने डीकेटीईच्या १८ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डीकेटीई मध्येे कॅम्पस इंटरव्हयूवच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याच्या कॅम्पस इंटरव्हिवसाठी सॉफ्ट स्कील चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्नीकल मुलाखातीसाठीही कॉलेजच्या तज्ञ प्राध्यपकांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्याना इंटरव्हयूवमध्ये होत आहे.
कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी असे ,सिध्देश माने, मेगनाथ नलवडे, वैभव डांगे, वेदश्री कानडे, हेमंत दानवाडे, प्रगती ननवानी, ॠतुजा पाटील, अदित्य दायमा, मयुरी शेटे, अदिती मगदूम, तेजस येलावकर, अर्पिता बरगाले, राकेश महाजन, किशोर हांगे, ऐश्वर्या कुलकर्णी, कल्याणी ढवळे, अनुष्का चिवटे , प्रशिक गवळी.
निवड झालेल्या सदर विद्यार्थ्यांचे
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, डॉ सौ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. डी.व्ही. कोदवडे, प्रा. डॉ. एस. ए. पाटील, टीपीओ प्रा. जी.एस. जोशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
*संवाद मिडिया*
*नोकरी👨🏻💻, व्यवसाय👨🏻💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻🎓*
_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*
_प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/
*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*
*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*
*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*
*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————