You are currently viewing मोदी @९ अभियाना अंतर्गत कणकवली विधानसभेत ‘हर घर संपर्क’ मोहीम सुरू

मोदी @९ अभियाना अंतर्गत कणकवली विधानसभेत ‘हर घर संपर्क’ मोहीम सुरू

लोरे नं.१ येथे जनतेच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

कणकवली

‘हर घर संपर्क’ या मोदी @ ९ अभियानातील उपक्रमाचा कणकवली विधानसभा मतदारसंघातील शुभारंभ कणकवली तालुक्यातील लोरे नं.१ येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.मोदी सरकारच्या ९ वर्षातील गौरवशाली कामगिरीचा लेखाजोखा असलेल्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक बुथवरील बूथ समितीच्या सदस्यांनी बुथमधील घरे विभागून घेऊन त्या त्या घरात जात नागरिकांशी संपर्क करावा.आणि 9090902024 या नंबरवर रिंग करून मोदीं सरकारच्या कामगिरीसाठी समर्थन द्यावे असे आवाहन करावे,असे या अभियानाचे स्वरूप आहे.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुलजी काळसेकर,जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.प्रभाकर सावंत,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सिंधुदुर्ग श्री.तुळशीदास रावराणे,कणकवली विधानसभा संयोजक श्री.मनोज रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजन चीके,भाजपा तालुका अध्यक्ष श्री.संतोष कानडे,दिलीप तळेकर,रवी पाळेकर,प्रकाश पारकर, पंढरीनाथ वायंगणकर, दामोदर नारकर,लोरे सरपंच अजय रावराणे, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर,लोरे उपसरपंच सुमन गुरव, शक्तिकेंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव,सुनील लाड व भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते,बूथ समिती सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा