शिक्षणाच्या बाबतीतील दरी धोकादायक असल्याची टिका…
दोडामार्ग
स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आताच्या शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे. गरिबांची मुले शिकू नयेत. त्यांनी शहरात, देश विदेशात जाऊन नोकरी करू नये, ते अडाणी, अज्ञानी राहावे आणि अंधभक्त बनून आपले झेंडे मिरवावेत, आपल्या विजयाच्या घोषणा देत फिरावेत, अशी मानसिकता सत्तेतील राज्यकर्त्यांची आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेने उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली.
वववत्यांनी म्हटले आहे, प्रचंड फी भरून श्रीमंतांची मुले शहरात आणि विदेशात शिक्षण घेत असताना इकडे ग्रामीण, गरीब, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांच्या शाळा मात्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे. ते अतिशय भयानक आणि भीतीदायक आहे. त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यापेक्षा इंग्रजांचे शिक्षण धोरण चांगले होते, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी सर्वांना समान आणि मोफत शिक्षण देण्याचे धोरण आखले होते. आताचे राज्यकर्ते मात्र गरिबांच्या मुलांच्या पुढचे शिक्षण काढून घेत आहेत, ते अतिशय वाईट आहे.