सिंधुदुर्ग :
रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा २१ जून २०२३ रोजी सुरू होणारा प्रवास रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियंत्रित केला जाईल. दि. २० जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल.