You are currently viewing कॅनव्हास

कॅनव्हास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*कॅनव्हास*

एके दिवशी मी व माझा मुलगा एका आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन गेलो होतो. चित्रकारांनी काढलेली विविध प्रकारची चित्रे त्या प्रदर्शनात होती. निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, समाजचित्र वगैरे वगैरे.. अनेक प्रकारच्या चित्रांनी भरलेली ती गॅलरी आणि तितक्याच उत्सुकतेने चित्रं न्याहाळणारे प्रेक्षक आणि मी…
जसजशी मी चित्रे बघत गेली तस तशी मी एका वेगळ्या विश्वात प्रवेश करत होते… चित्रांमधून प्रत्येक जण आपापले भावविश्व उलगडत होते…
अनेकांची कुजबुज माझ्या कानी पडत होती..
मी एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकले आहे हे एव्हाना मला जाणवले होते… भिंतीवर लावलेली चित्रं ही चित्र नसून अनेकांचे भावविश्व उलगडणारं माध्यम आहे हे मला तिथे ती चित्र बघताना प्रकर्षानं जाणवलं…
आणि बघता बघता संपूर्ण सभागृह भरून गेलं.. एखाद्या पांढऱ्याशुभ्र कागदावर हळूहळू रंग उमटत जावं ना अगदी तसंच्च काही..!
एकक जण एकाच चित्राकडे बराच वेळ बघत होते व मग मी ही त्यांना लांबून न्याहाळत होते…त्यांच्या चेह-यावरचे भाव वाचत होते…
नकळतच माझे कवी मन जागे झाले.
एक बाई उमललेल्या फुलाच्या चित्राकडे कौतुकाने पाहत होती जणू कळीचे फूल होणे म्हणजे काय हा
विचार करत होती की काय? असा माझ्या मनाला पडलेला प्रश्न..
अतिशय प्रसन्न मुद्रेने ती ते चित्र पाहत होती… त्या सुंदर फुलाच्या चित्रात ती हरवून गेली होती.. त्यांच्या संसार वेलीवरल्या कळीचे स्वप्न रंगवत…
स्वतःचा असा स्वप्नाचा कॅनव्हास नाही का..!
प्रत्येक चित्रापुढे एक गृहस्थ थांबून तेथे जमलेल्या प्रेक्षकांना काहीना काही सांगत होता… त्याच्या भोवतीचा माणसांचा गराडा मंत्रमुग्ध होऊन त्याचं प्रत्येक चित्राचा अर्थ, चित्राचं म्हणणं मन लावून ऐकत होते…
सायकल चालवणारा माणूस, फुगे विक्रेता, निसर्गचित्र, पावसात चिंब भिजलेलं शहर , कष्ट करणारी मुले बायका अश्या असलेल्या अनेक चित्रांबाबत तो त्याच्या शैलीने रंग भरत बोलत होता…
तो माणूस आणि त्याच्या भोवती असलेला प्रेक्षक असा एक वेगळाच सीन तयार झाला होता…. अनुभवाच्या रंगांतून तयार झालेला एक वेगळाच कॅनव्हास.
आयुष्यातले सर्वच रंग मला या ठिकाणी एकाच वेळेस दिसू लागले होते… कोणाच्या चेहऱ्यावर तर कोणाच्या बोलण्यातून आणि भिंतीवर लावलेल्या अनेक प्रकारच्या चित्रांतून हे रंग पाझरत होते माझ्याच मनात…
!! आयुष्याच्या कॅनव्हासवर
नकळत रेखाटलेल्या रंगांना
चित्र होताना पाहिले..!!
या साऱ्याचे एक अनोखे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. असाच विचार माझ्या मनात चालू असताना माझे डोळे समोरच्या भिंतीवर लावलेल्या सांजवेळेच्या चित्राकडे स्थिरावले.. मी एकटक त्या चित्रातकडे बघत राहिली आणि अचानक माझी नजर माझ्याच प्रमाणे त्या चित्राकडे टक लावून पाहणा-या आजोबांकडे गेली…. चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत ओसंडून वाहणारा अनुभव, राबराब राबलेले हात व त्या हातात त्यांचा सर्वात जवळचा आधार असलेली काठी आणि त्या सांजवेळेच्या चित्रावर स्थिरावलेली त्यांची नजर…
कित्येक संध्याकाळ त्या आजोबांना आठवल्या असतील… एखादी अविस्मरणीय संध्या झर्रकन त्यांच्या
डोळ्यांसमोरून गेली असणार… ते
सांजवेळेचं चित्र त्यांना अत्यंत जवळचं वाटले असणार…असे मला मनोमन वाटून गेले…
चित्रकाराने अतिशय सुंदर शैलीने संधीप्रकाशात नाहून निघालेल्या संध्येचे चित्र काढले होते.. ते सांजवेळेचे चित्र आणि ते आजोबा असा भावनांनी रंगलेला कॅनव्हास मी अगदी जवळून पाहिला…
चित्र ही आपल्याशी संवाद साधत असतात.. ते त्यांचं त्यांचं मनोगत ही व्यक्त करत असतात असं मला नेहमीच मनापासून वाटतं..
प्रत्येकाचा चित्राकडे बघण्याचा
दृष्टिकोन वेगवेगळा असतोच…
आत्ता पर्यंत आर्ट गॅलरी संपूर्ण भरून गेली होती.. प्रत्येक जण चित्रकला
जवळून न्याहाळत होते आणि मनातल्या मनात चित्रकारांची पाठही थोपटत होते… तेवढ्यात जोडप्याचे चित्र पाहण्यात दंग झालेले एक जोडपं माझ्या नजरेतून काही सुटलं नाही..तशी माझी नजर जरा तीक्ष्णच
पावसात एकाच छत्रीत ओल्या रस्त्यावरून चालत जाणारं ते जोडपं. अगदी माझ्यासकट कोणालाही आपापल्या आठवणीत घेऊन जाणारं
चित्रकाराने सर्वच वयोगटातील लोकांचा विचार करून चित्र रेखाटली असावीत असं क्षणभर मला वाटून गेलं…संध्याकाळकडे झुकलेले शहर, त्या शहरातला ओलाचिंब रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालत जाणारं जोडपं तसेच रस्त्यावर पडलेले लाईटच्या खांबाचे प्रतिबिंब
चित्रकाराने ते चित्र अगदी तंतोतंत रेखाटले होते.. तरुणांची नस अचूक ओळखून चित्र रेखाटलं होतं…तरुण मनाच्या कॅनव्हास वर रेखाटलेले हे चित्र.. ते चित्र पाहण्यात ते जोडपे अगदी चिंब भिजले होते… त्यांचा प्रेमाने भरलेला कॅनव्हास त्यांनी पुन्हा उलगडला.. प्रेमाचा लाल रंग अजून गडद करण्यासाठी… प्रेमाचा कॅनव्हास…
या चित्रांतून जसं मोठ्याचं विश्व
उलगडलेलं पाहिलं तसंच लहानग्यांचं देखील विश्व चित्रांतून मला दिसून आलं… बागेत खेळणारी मुलं, फुगेवाल्याकडून फुगा घेणारा मुलगा, आईचा हात धरून शाळेत जाणारी
मुलगी, आई बरोबर कष्ट करणारा मुलगा, विटा आपल्या डोक्यावर घेऊन जाणारा मुलगा, कष्ट करताना मुलाच्या डोळ्यात दिसणारे कारुण्य
अश्या अनेक छटा..! लहान मुलांच्या भावविश्वाचा…. हा चिमुकल्यांच्या भावविश्वाचा कॅनव्हास या चित्राच्या निमित्ताने उलगडला… ती चित्रे पाहण्यात मी हरवून गेली होती आणि मी त्याच्यात माझं लहानपण पाहत होते…
निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र , समाजचित्र या चित्रांतून तर एक वेगळाच विश्वाचा कॅनव्हास तयार झाला..
अनेक प्रकारची चित्रं अनेक प्रकारची माणसं प्रदर्शनाच्या निमित्ताने मला बघायला मिळाली…
प्रत्येकाच्या मनातलं कधीकाळचं अपूर्ण चित्रं या प्रदर्शना निमित्त पूर्ण झालं होतं..काही चित्रांमुळे काळ मागे गेला तर काही चित्रांमुळे काळ पुढे गेला आणि काही चित्रांनी तर काळ विसरायला लावले होते…
मी चित्रकारांस दाद देत तेथून बाहेर पडत त्याचे मनोमन आभार मानले.. माझ्या आयुष्याचा कॅनव्हास अजून
रंगीत केल्याबद्दल…!

लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020

 

______________________________
*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा