*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*
*कुठे आहे देव*
देव कुठे आहे,तो कसा आहे ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरे माहीत आहेत का कुणाला?
माझ्या मते देव ही एक सुपर नॅचरल पाॅवर आहे.अगाध शक्ती आहे.कोणतेही चांगले काम करताना,म्हणजे परीक्षेला जाताना,कोणत्याही शुभ कार्यारंभी आपण प्रथम देवाला नमस्कार करतो. आमची आजी घरातल्या प्रत्येकाला बाहेर जाण्यापूर्वी शंकराच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय जाऊ देत नसे.तसेच संकट काळी मग ती शारिरीक,मानसिक,नैसर्गिक कोणतीही आपत्ती असो त्यातून सहीसलामत बाहेर येण्यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो,त्याचा धावा करतो,त्याला साकडे घालतो,”बाबारे कुठे असशील तिथून ये पण मला या संकटातून सोडव.” याचाच अर्थ असा की आपण त्या शक्तीला पाचारण करतो,जागवितो.ही शक्ती आपल्यातच असते आणि त्यामुळे प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ आपल्याला मिळते.आपल्यातील आंतर्शक्ती आपणच जागृत करतो.
आपण सामान्य देहधारी माणसे.माझा हा देह म्हणजेच मी असे मानणारे.प्रत्येक जन्माला येणारा माणूस एक ना एक दिवस हा देह सोडून जातो.त्याचा मत्यू अटळ आहे.परंतु देह म्हणजे नक्की काय? तर पंचमहाभुतांचे जीवात्म्यावरील एक आवरण,जे द्दृष्य स्वरूपात आहे,जे नाशीवंत आहे,अशाश्वत आहे.जीवात्मा मात्र दिसत नाही,तो कधीही नाश पावत नाही,तो शाश्वत आहे.हा जो शाश्वत आत्मा तेच अंतरंग,तेच परब्रम्ह आणि तोच परमात्मा.अखिल सृष्टीचा निर्माता!
चंद्र,सूर्य,आकाशातील तारे,डोंगर,पर्वत,नद्या,नाले,पशू,पक्षी,वृक्ष,लता,फळे,फुले,पाने आणि ह्या सर्वांवर मात म्हणजे मानव, ही सर्व निर्मीति ह्या ब्रम्ह्याची,परमात्म्याची.
सगळे कसे एकमेकांवर विसंबून असणारे.सूर्यप्रकाशाशिवाय जगणे अशक्य,चंद्राचा शीतल प्रकाश सुखद,मनाला आल्हाद देणारा. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होतात आणि बरसू लागतात.जमिनीतून रोपे उगवतात,सजीवांचा उदर निर्वाह होतो.जीवनचक्र सतत चालूच रहाते.
ही सर्व किमया त्या अद्दृष्य परमात्म्याची.
हिंदू धर्मानुसार आपण तेहतीस कोटी देवतांना मानतो.गणपती सुखकर्ता दुखहर्ता आहे,विद्येचे दैवत आहे असे मानून त्याची पूजा केली जाते.शंकर~ पार्वती,विठ्ठल~रखमाई ही दैवते परमपूज्य आहेत.महालक्ष्मी,महासरस्वती,महाकाली ह्या पराक्रमाच्या देवता म्हणून त्यांचे उत्सव आपण साजरे करतो.आषाढी ~कार्तिकीला वैष्णवजन पायी पंढरीची वारी करतात.ह्या आपल्या सामान्य जनांच्या भावना आहेत.मनातील भक्ती प्रकट करण्यासाठी आपल्याला द्दृष्य स्वरूपात काहीतरी साधनाची आवश्यकता असते.यासाठीच या सर्व देवांच्या मूर्ति करून त्यांना देव्हार्यात,मंदीरात,राऊळात स्थापन करून आपण आपला भक्तीभाव व्यक्त करतो.
हीच झाली सगूण भक्ती.
पुराणातल्या,भागवतातल्या अनेक कथा आपण वाचल्या आहेत.भक्त प्रल्हादाला वाचविण्यासाठी परमेश्वर नृसिंह अवतार घेऊन
खांबातून प्रगटला.प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने
शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला,पुनरुज्जीवन मिळाले,वडाच्या झाडाखाली मृतवत् पडलेल्या सत्यवानाचे प्राण अत्यंत कडक व्रत करून सावित्रीने परत मिळवले.प्रत्यक्ष परमेश्वराने जनाबाईचे दळण दळले,तिची लुगडी धुतली.कबीराचे शेले विणले.गोरा कुंभाराचे चिखलात तुडवलेले बाळ पुन्हा परत आणले.नामदेवाच्या कीर्तनात स्वतः पांडुरंग नाचले,त्याने दिलेली खीर खाल्ली.चोखोबाची गुरे राखली.
आजच्या काळात पुढे जाऊन या सर्व कथांचा विचार केला तर असे म्हणावे लागेल की ही सर्व संतमंडळी देहभान विसरून फक्त हरीभजनात इतकी गुंग होती की त्यांना त्यांचे कष्ट जाणवतच नव्हते,ते त्यांच्या अंतरात्म्यात विलीन झाले होते,परमेश्वराशी एकरूप झाले होते.त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर भेटला होता.त्यांचे कर्तेपण नाहीसे झाले होते.
परमेश्वर हा निर्गूण आणि निराकारच आहे,सगूण भक्ती हा त्या निर्गूणापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग आहे.
समर्थ रामदासस्वामींनी श्री रामचंद्राची उपासना केल्याने त्यांना आत्मज्ञान झाले असे म्हटले आहे.ते साधकांना सांगतात,
*रघुनाथा स्मरोनी।कार्य करावे।*
*ते तत्काळची सिध्दी पावे।कर्ता राम हे असावे*
*अभ्यंतरी*।।
*कर्ता राम मी नव्हे आपण*
*ऐसे सगूण निवेदन।निर्गुणी ते अनन्य*
*निर्गूणचि होईजे*।।
*मी कर्ता ऐसे म्हणता।काहीच घडेना सर्वथा*
*प्रचित पाहसी तरी आता।सीघ्रची पाहे*।।
सगुणोपासना केल्याने आत्मज्ञान होते.सामान्य जन देहबुद्धीमुळे कर्तेपण स्वतःकडे घेतात.वास्तविक जगातील सर्व घटना ईश्वरी सत्तेनेच घडतात.हे कर्तेपण स्वतःकडे न घेता ज्याचे त्याच्याकडे देणे हा सगुणोपासनेचा प्राण आहे.
संभ्रमित झालेल्या अर्जूनाला भगवंतांनी त्यांचे विश्वरूप दर्शन घडविले त्यावेळी ते तेजःपुंज रूप पाहून अर्जून भयभीत झाला आणि त्याच्या हे लक्षात आले की भगवान श्रीकृष्ण हेच परमात्मा आहेत,संपूर्ण विश्वात त्यांचा वास आहे. जो अनन्यभावाने त्यांची भक्ती करतो त्यालाच आत्मज्ञान होते आणि अंतरात वसलेल्या परब्रम्हाचे दर्शन घडते.
जे आत्मज्ञानी असतात त्यांचा देहाभिमान विरून गेलेला असतो.त्यांना आपण संत म्हणतो.
जसे शिरडीचे श्री साईबाबा,अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ,शेगावचे गजानन महाराज,गोंदवल्याचे ब्रम्हचैतन्य महाराज वगैरे! त्यांना देवत्व प्राप्त झाले होते.
आज ज्यांनी कुष्टरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उभे आयुष्य वेचले ते बाबा आमटे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, जी असंख्य अनाथांची माय झाली त्या सिंधूताई सपकाळ आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना आपण देवमाणसे म्हणून संबोधू शकतो.
ही सर्व मंडळी आत्मज्ञानी आणि परमेश्वराशी तादात्म्य पावलेली असे म्हणावे लागेल.
चराचरात वसलेला हा परमेश्वर निर्माता तर आहेच,पण तो रक्षकही आहे आणि दुष्ट प्रवृत्तींचा संहारकही आहे.तो अनादी आहे,अनंत आहे आणि प्रत्येकाच्या अंतरात तो नांदत आहे.आम्हीच करंटे हे जाणण्याची आम्हाला बुद्धी नाही.
अरूणा मुल्हेरकर
मिशिगन
संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻🎓*
📣 *B. C. A. DEGREE*
*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑💻🧑💻
*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*
*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*
*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-