You are currently viewing वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ तुळस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा वेंगुर्ला आयोजित सलग २१ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्था मुंबई,बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सावंतवाडी च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रीय खेळाडू आणि पंच अशोक दाभोलकर हस्ते दीपप्रज्वलनाने व गणेशपूजन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच रश्मी परब, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, ग्रा.प. सदस्य जयवंत तुळसकर, वैधकीय अधिकारी राहुल पाटील , प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ,सुजाता पडवळ, सुधीर चुडजी, सिद्धेश नाईक, ॲलिस्तर ब्रिटो, राजेश पेडणेकर, श्रीकृष्ण कोंडस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक अशोक दाभोलकर यांनी मनोगत व्यक्त करताना रक्तदान सारख्या उपक्रमाचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे. सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहीन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहे. सामाजिक उपक्रमासह कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमातही योगदान उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम वेताळ प्रतिष्ठान करत असल्याचे सांगत प्रतिष्ठानचे कौतुक केले.
दयानंद गवस यांनी रक्तदान ची चळवळ अविरत चालू ठेऊन समाजाचे खऱ्या अर्थाने समाजाचे देणे देत आहात असा शब्दात प्रतिष्ठान च्या कार्याचा आढावा घेतला. सरपंच रश्मी परब व वैद्यकीय अधिकारी राहुल पाटील,सुजाता पडवळ यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमांस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४२ दात्यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, श्री सद्गुरूनाथ भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार सचिन गावडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा