कुडाळ
राष्ट्रवादी युवक काॅगेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडीचे पत्र प्रफुल्ल सुद्रीक यांना दिले आहे. ८ ऑगस्ट २०१३ पासून ते राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष होते. प्रफुल्ल सुद्रीक यांनी आपल्या कारकीर्दीत युवक संघटना वाढविण्यासाठी जोरदार कंबर कसली होती. युवकांची फळी बांधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघात सुद्रीक यांनी तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश सावंत व शिवसेना उमेदवार जान्हवी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांचे संघटन कौशल्य बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पुन्हा युवक जिल्हाध्यक्षपदी घोषणा करून नियुक्तीचे पत्र दिले आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी ओरोस येथे झालेल्या मेळाव्यात युवकांची उपस्थिती ठेवून मेळावा यशस्वी करण्यात प्रफुल्ल सुद्रीक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या निवडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच बरोबर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.