सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व युवाक्रांती सुशिक्षित बेरोजगार संस्थेचा उपक्रम
कुडाळ
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या डिगस चोरगेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात बनाना राईड,स्पीड बोट,नौका विहार आदी जलपर्यटन उपक्रमांचा शुभारंभ पाटबंधारे विभाग,आंबडपाल कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उप अभियंता पाटील,शाखा अभियंता जोशी, संस्थेचे पदाधिकारी प्रसाद गावडे,राजेश टंगसाळी,अमोल जंगले,डिगस ग्रामस्थ शेखर गोसावी, प्रवीण पवार, ओम शिव मोरेश्वर वॉटर स्पोर्ट्सचे दामोदर तोडणकर आदी यासंह ग्रामस्थ उपस्थित होते. युवाक्रांती सुशिक्षित बेरोजगार संस्था व ओम शिव मोरेश्वर वॉटर स्पोर्ट्स,मालवण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी काळात गोवा,कर्नाटक या राज्यातील देखील पर्यटक या उपक्रमास भेटी देणार असल्याने स्थानिक नागरिकांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. डिगस चोरगेवाडी तलाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.