You are currently viewing सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना मिळाला मदतीचा आधार..!

सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना मिळाला मदतीचा आधार..!

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी जोपासत एका संकटात असलेल्या कुटुंबाला जीवनावश्य वस्तू व रोजगाराच माध्यम देण्यात आलं. महिन्याभरा पूर्वी सावंतवाडी बाहेरचावाडा येथील एका झोपडीला आग लागून झोपडी पूर्णपणे जळून बेचिराख झाली होती. अन् कष्ट करून मिळवलेल्या संसारातील सर्व वस्तू व रोजगाराचे माध्यम असलेली शिलाई मशीन सहित लग्नसराईमध्ये ग्राहकांच्या शिवणकामासाठी घेतलेले साड्या, ब्लाऊज जळून खाक झाल्या.

तेव्हा त्या गरीब कुटुंबावर फार मोठे संकट ओढावले होते. त्यांना सामाजिक बांधिलकीने मदतीचा हात देऊन जीवनावश्यक वस्तू, भांडी व रोजगाराच माध्यम म्हणून व त्यातूनच कष्ट करून आपल्या जीवनाची पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी शिलाई मशीन सुपूर्त करण्यात आली. या मदत कार्यासाठी भांड्यांच्या स्वरूपात दत्तप्रसाद गोठोस्कर व अपर्णा कोठावळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

शहर व शहरा बाहेरही संकटात असलेल्यांना मदतीचा हात देणारे सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे,समीरा खालील, शेखर सुभेदार, शरद पेडणेकर, हेलन निबरे, वकील अशोक पेडणेकर, शामराव हळदणकर व रवी जाधव संकटात असलेल्यांना यथाशक्ती मदतीचा हात देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. तसेच इतरांनीही संकटात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचून मदतीचा हात द्यावा, असा हि या माध्यमातून संदेश देण्याचं काम सामाजिक बांधिलकी करते.

सामाजिक बांधिलकीच्या ह्या उपक्रमाने संकटात असलेल्या सदर दांपत्याने भावनिक होऊन सामाजिक बांधिलकीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनः पूर्वक आभार मानले. या प्रसंगी फुल विक्रेते प्रसाद (दादा) परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा