*स्नेहल प्रकाशन परिवार सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ. प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*
*मी कोण*
*( शरीर शारीरी भाग 3 )*
सोड तुझा गर्व व्यर्थ हा
किती दिवस तु जगाशी
माती मधुनी येशी मानवा
माती मध्ये जशी। ।।1।।
दागदागिने रत्न आभूषणे
खाद्य पेय पक्वान्न ते खाणे
भरजरी वस्त्र पोशाख अभरणे
सांग तु ते का नेशी ।। 2 ।।
गाडी बंगला जमीन शेती
आले होते का कधी तव संगती
आप्तगणगोत मिथ्या नाती
दैवगतीने सदा तू फिरशी ।। 3 ।।
प्रभुकृपेने सर्वही दिधले
प्राक्तनाने तर तम पावले
जीवनाचा सागर तरता
कर्म गतीच्या राशी
मातीमधुनी येशी मानवा
मातीमध्ये जाशी ।। 4 ।।
अनादी अनंत असा हा मानवाचा (आत्म्याचा) प्रवास ! किती युगे किती वर्षे ! रूढी , परंपरा , सण वार उत्सव ! अखंड चालु ! एकूण जगण्याचाच सोहळा मानव करत आला .
” मी कोण ”
असा कधी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पाहिले आहे का ! हा प्रश्न तुम्हाला कधी पडला होता का ! बहुतेक नाहीच अस गृहीत धरू. जर तुम्हाला कोणी विचारलं तर उत्तर तयार असतेच . मी मामा , मी ह्याची मावशी , मी आत्या , मी ह्याचा बाबा ,इत्यादी तसेच काहीवेळा मी डॉक्टर , मी इंजनियर , वकील इत्यादी हुद्द्याची पेरणी केलेली दिसते ! मी जीवात्मा !! अस कोण म्हणल्याच ऐकीवात नाहीच !
नेमके आपण आहोत तरी कोण ? आपले अस्तित्व किंवा अवतार कोणत्या कार्यासाठी जन्म घेतला आहे ? असा विचार कोण केलात का ?
सजीव सृष्टी ला पडलेलं स्वप्न !
हे शरीर कोणाचे ! पंचभौतिक शरीर त्यात वसणारा आत्मा व मन , त्रिगुणात्मक प्रकृती ! षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेले मन अत्म्य समाधान करून झिजणारे शरीर . बाळ तरुण वृद्धावस्था ! वाट्याला आलेलं भोग भोगून सारणारा आत्मा . शरीर हे त्याचे वस्त्र जे मृत्य आहे ! त्या शरीराचे भोग सोहळे जगणारा जीव !
Death is cock sure हे माहीत असूनही रंगभूमीवर नाटकाचा पात्र करणार शरीर ! “जिथं तिथं मी व मी पणाचा आव ” मी कविता लिहली , मी साहित्य निर्माण केलं !, मला ज्ञानपीठ मिळालं इत्यादी इत्यादी .
हे कोण करवून घेत कोणाकडून हे ज्ञान येत !
आपण सर्व मंदिरात जातो घंटा वाजवतो , आपण मंदिरात आलोय अस जणु देवाला वर्दी देतो . मग प्रसाद तीर्थ घेतो , मनातील इच्छा मनात च सांगुन देवाला साकडं घालतो . नन्तर प्रदक्षणा घालतो , का तर मला ह्या जन्म मृत्य फेऱ्यांतून सुटका कर ! जाताना न विसरता अंगारा ( भस्म ) लावतो व पुडीत बांधुन पण घेतो , तेव्हा त्यावेळी देवाला तुम्हाला हे सांगायचे असते की तुझं पण असच शेवटी’ भस्म ‘होणार
तु अविनाश नाहीस ! जो जन्मला तो एक ना एक दिवस मृत्यूला समोर गेलाच पाहिजे हे त्रिवार सत्य. तुझा पण शेवट असच पंचभुतात विलीन होणार!अस असताना सुध्दा तो आशेवर जगत असतोच का तर त्याचे कर्म पक्व होई पर्यंत .
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट
