जलसंपदा विभागमध्ये सहाय्यक अभियंता (Gazetted officer) पदावर नियुक्ती
दोडामार्ग
तालुक्यातील शिरंगे येथील अनिकेत अंकुश गवस याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ यामध्ये महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागमध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी -२ (Gazetted officer) या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. महत्वाचे म्हणजे कोणतेही मोठे क्लासेस न लावता केवळ अभ्यासिकेत राहून त्याने स्व अध्ययनातून हे यश प्राप्त केले आहे.
अनिकेतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, अभियांत्रिकी शिक्षण डॉ. बी आर आंबेडकर, युनिव्हर्सिटी रायगड (सिव्हील इंजिनिअर) येथून झाले त्याचे वडील अंकुश लक्ष्मण गवस (सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक , जलसंपदा विभाग), आई- सौ.अंकिता अंकुश गवस अंगणवाडी सेविका आहेत त्याच्या या यशात त्यांचेही मोलाचे सहकार्य आहे. दोडामार्ग तालुक्यातील या युवकाने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
