*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंगमंचावरची… दुसरी विंग….!!*
बॅकड्राॅपवर देखणा अविष्कार
नाट्यविष्कार …सादर केला
अभिनयाची ..उत्तम बॅटिंग
रंगमंच प्रचंड… गाजवला..!
माझ्या वेडेपणातही मला
प्राॅम्पटींगच्या शब्दांनी पोसले
रंगमंचावरची…. दुसरी विंग
नाटकाला.. कसेबसे पेलले..!
फुलत गेलेल्या नाट्याला
जगण्यातून अधोरेखित केले
क्षणाक्षणाला उत्कंठा ताणणारे
क्षण..रसिकांना खुणावत गेले..!
वनलाईनरही ..पुरेशी होती
शब्दसामर्थ्य दाखवत.. बसलो
प्रसंग अतिगंभीर ..रंगवता-रंगवता
ओवरअॅक्टींग करून ..चुकलो..!
जीवघेणा.. ताण घेत
जगणं …प्रयोगांकित केले
तालिमीला …रंग फासून
जगणचं …नाटकी झाले….!!
आयुष्याच्या अंगणात..चेहरे माझे
मेकअपने माखले गेले
करूणेचे गहिरे..पाणी
डोळ्यांत दाटून आले..पडदा पडला
बाबा ठाकूर
