You are currently viewing शब्द असेल तो नक्की देवा

शब्द असेल तो नक्की देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्द असेल तो नक्की देवा*

 

आयुष्याचे सोडवून कोडे

विचार आता नको करू

निवृत्त झालीस संपादक

पेन हाती *नकोस धरू*

//1//

पहावत नाही चेहरा तुझा

दुनिया पळते *A I मागे*

अडून बसलीस शब्दासाठी

आठवणीचे कां झाले वांगे

//2//

शब्दासाठी अडून बसलीस

काय म्हणून ग *सखे तुला*

अख्खी गेली हयात शाळेत

*वंचित झालीस शब्दाला

//3//

फक्त करायचा फोन एकदा

चुटकीसरसे सोडवू कोडे

होईल चेहरा *तजेलदार*

सूर्य पाहशील पश्चिमेकडे

//4//

असा चिंतीत पाहिला नव्हता

चेहरा कुठल्या *विदुषीचा*

असून तू तर *टॉप वन*

*बाऊ केलायस कोड्याचा*

//5//

आठव नाव *सर्व फुलांची*

मिळेल त्यात *काही दुवा*

चुटकी सरशी *सुटेल प्रश्न*

शब्द असेल तो *नक्की देवा*

//6//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

3010/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा