*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम चित्रकाव्य*
*चित्रकाव्य*
संसाराचं ओझं घेऊन
तू घराला घरपण दिलं,
सुख-दुःखाच गाडं ओढताना
जगणं तुझं राहून गेलं.
भल्या पहाटे उठून तुझा
दिवस सुरू व्हायचा,
संध्याकाळी तुळशीपुढे
तूच दिवा लावायचा
दिवसभर राबूनही तुला
जराही विश्रांती नसायची,
थकली-भागली तरी तू
लेकराबाळांना घेऊन बसायचीस.
चार भिंतींच्या घरामध्ये
तुझं आयुष्य सरून गेलं,
पाखरं सारी उडून गेली,
आता कोणीच नाही राहिलं.
तुझ्यासोबत भाकर खाऊन
तू माझाच विचार करत राहिली,
तुझ्या काळजाच्या देव्हाऱ्यात
मी माझी माय पाहिली.
अगं, सुख-दुःख वाटून घेतली,
लावली जीवापाड माया,
कष्ट केले भाराभर,
झिजवली किती काया!
सात जन्मांचा संसार
झाला सुखानं पार,
पुढल्या जन्मी मिळू दे
पुन्हा तुझाच आधार.
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
