*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित स्वादिष्ट पाककृती*
*हिरव्या मुगाचा ढोकळा*
*साहित्य*_१ वाटी इडली रवा, १ वाटी मोड आलेले हिरवे मूग (किंवा नुसते भिजवलेले ही चालते) हिरवी मिरची ,आलं कढीपत्ता, फोडणी
*कृती*_इडली रवा धुऊन एक तास भिजत ठेवले. भिजलेले हिरवे मूग किंवा मोड आलेले हिरवे मूग मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात आलं हिरवी मिरची थोडा कढीपत्ता आणि मीठ घालून वाटून घेतले. आणि ते सर्व इडली रव्यात ओतून छान फेटून घेतले.त्यात थोडे हळद, हिंग चवीप्रमाणे हवे असेल तर मीठ घालून थोडासा सोडा घातला. आणि वाफवून ढोकळा काढला. थंड झाल्यावर कट करून ठेवला. इकडे एका कढल्यात तेल मोहरी जिरे, हिंग हळद कढीपत्ता मिरचीचे तुकडे घालून फोडणी करून घेतली. नंतर त्यात थोडे पाणी साखर थोडेसे मीठ घालून सर्व मिक्स करून ढोकळ्यावर घातले. पाच दहा मिनिट तसाच ठेवून मग त्यावर कोथिंबीर हवे असेल तर सुके खोबरे ओले खोबरे घालून सर्व्ह करावे.
खूप मस्त आणि झटपट हा ढोकळा तयार झाला आणि टेस्टी ही खूपच आहे.
हेल्दी तर आहेच..
करून बघताय ना मग..
*टीप*_सोडा नको असेल तर पीठ आंबवून घेणे. मग ढोकळा करणे.
