You are currently viewing करतो आहे उगा लगट

करतो आहे उगा लगट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*करतो आहे उगा लगट*

पिऊन दूथ झाला *तर्र*
नव्हत घातलं काही खास
लगट करतोय *लाटांशी*
त्यांचा आहे दृढ विश्वास
//1//
येतात कधी जवळ लाटा
घेतो चुंबन *अलगद*
नाही लागत पत्ता दुजीला
तरीही होतो नाजूक नाद
//2//
कधी शिरून कुशीत त्याच्या
कौतुक करते आफाट
भान न *रहाते तेव्हा*
लाट होते तेव्हा लंपट
//3//
सायकल गेली जरी ठरून
चांदणी बसते तरी रुसून
खेळत बसतो *लाटांसंगे*
रडू लागती *मुस मुसून*
//4//
परंपरा ही आनंत वर्षांची
मनुष्य शोधतो आनंद त्यात
दूध प्यायला बोलवून घेतो
प्रियकर घेतो हातात हात
//5//

विनायक जोशी 🖋️ठाणे
1710/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा