वैभववाडी महाविद्यालयात पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काव्यवाचन उत्साहात संपन्न.
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काव्यवाचन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के.आर.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त व स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे, प्रमुख पाहुण्या डॅा. दर्शना कोलते, गटशिक्षण अधिकारी श्री. थोरात, उपप्राचार्य डॉ. माणिक चौगुले, स्टाफ सचिव प्रा.सुरेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राहूल भोसले व श्री. एस.एन. पुरीबुवा उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कविवर्य नारायण सुर्वे व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रतीमा पूजन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र असलेले नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
या सोहळ्यात वैभववाडी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील केंद्रप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे प्रभावी वाचन करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. दर्शना कोलते यांनी नारायण सुर्वे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यिक योगदानाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रभावी आढावा घेतला. सुर्वे यांच्या कवितांमधून श्रमिकांचे जीवन, सामाजिक वास्तव, मानवी संवेदना आणि संघर्षशील विचारांचे दर्शन घडते.
नारायण सुर्वे यांच्या कवितेतून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.
गटशिक्षणाधिकारी श्री. थोरात यांनी या अभिनव साहित्यिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना साहित्यिक विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचे सामाजिक महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
या काव्यवाचन कार्यक्रमाला विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणून मराठी साहित्याचा समृद्ध वारसा जपणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजीवनी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर तर आभार प्रा. डी. एस. बेटकर यांनी मानले.
