You are currently viewing जय भवानी गोंधळी समाज संघाच्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

जय भवानी गोंधळी समाज संघाच्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

मंडळाच्या वतीने ना. नितेश राणे यांचा सत्कार

कणकवली : जय भवानी गोंधळी समाज संघ, कणकवली येथे आयोजित नवरात्रोत्सवाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आई दुर्गामातेचे दर्शन घेतले. दरम्यान, मंडळाच्या वतीने ना. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जय भवानी गोंधळी समाज संघाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे, उपाध्यक्ष शिवाजी भिसे, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन वाघमारे, गोंधळी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे, वैभव इंगळे, सुभाष इंगळे, भीमराव इंगळे, विधजित भिसे, कृष्णा इंगळे, दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, बंडू हर्णे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा