You are currently viewing तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश:

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश:

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश:

सावंतवाडी

थाळीफेक व गोळाफेक स्पर्धेत कु. अस्मी सावंत आणि कु. अनिका सुकी यांची उल्लेखनीय कामगिरी दर्शवली. तालुकास्तरीय शालेय मैदानी (अथलेटिक्स) स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रशालेचा नावलौकिक वाढवला. १४ वर्षे वयोगटातील या स्पर्धेत प्रशालेचे एकूण सात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी इयत्ता ८ वी मधील कु. अस्मी सावंत व इयत्ता ६ वी मधील कु. अनिका सुकी यांनी थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांत यश संपादन करत आपले क्रीडाकौशल्य सिद्ध केले. या स्पर्धेत कु. अस्मी सावंत हिने थाळीफेक प्रकारात १६.८७ मीटर अंतरावर थाळी फेकून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. अनिका सुकी हिने गोळाफेक प्रकारात ६.६० मीटर अंतरावर गोळा फेकून द्वितीय क्रमांक व थाळीफेक प्रकारात १५.४० मीटर अंतरावर थाळी फेकून तृतीय क्रमांक मिळवला.
दोन्ही विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, सरावाचे आणि क्रीडाक्षेत्रातील जिद्दीचे प्रतीक आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे प्रशिक्षक श्रीयुत शैलेश नाईक सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी कु. अस्मी सावंत आणि कु. अनिका सुकी यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील क्रीडावाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा