You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत राजू मसुरकर यांचा २६ वर्षांपासून सातत्यपूर्ण पुढाकार

सावंतवाडी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात वाढलेली झाडी आणि त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सावंतवाडी नगरपालिकेमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मलेरियासारख्या आजारांचा धोका उद्भवू नये, तसेच परिसर स्वच्छ व आरोग्यदायी राहावा, हा या मोहिमेमागील उद्देश आहे.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर हे गेल्या २६ वर्षांपासून रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत दरवर्षी ते या परिसरातील साफसफाई करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होत असून, रुग्णांच्या आरोग्याबाबतची त्यांची बांधिलकी अधोरेखित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा