भूमि कदमची लांब उडीत भरारी; तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक
न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाव-बोर्डवेच्या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
कणकवली, प्रतिनिधी :
श्री कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाव-बोर्डवे प्रशालेची विद्यार्थिनी कु. भूमि राजेश कदम हिने कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भूमि हिने आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भूमिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही तिने अशीच मेहनत घेऊन क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
