चिंदर येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत चिंदर आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम
चिंदर, प्रतिनिधी :
आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, चिंदर (आरोग्य उपकेंद्र), ग्रामपंचायत चिंदर आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर चिंदर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर (आरोग्य उपकेंद्र) येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. विवेक घाटगे (९१४५१३८४३१), आरोग्य सेवक संतोष सावंत (९४२२९७२८५५), आरोग्य सेविका सरिता जंगले (७४९८६५०४६४) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे (८३९०९०५२६९) यांच्याशी संपर्क साधावा.
हे आवाहन आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जुवेरीया मुजावर, डॉ. संकेत मेहरकर तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंदजी गवस यांनी केले आहे.
शीर्षकातील ‘उद्या’ काढून तारीख द्या
आयोजकांची नावे संक्षिप्त करा
मोबाइल क्रमांक वेगळे ठळक करा
