पिंपरी चिंचवड : दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे निमंत्रित स्थानिक कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये संजय जगताप,दत्तू ठोकळे,शोभा जोशी, जयश्री श्रीखंडे, जयद्रथ आखाडे,आय के शेख, प्रदीप गांधलीकर, डॉक्टर मीनल लाड,बाबू डिसोजा, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस, पितांबर लोहार,सीमा गांधी,सविता इंगळे, योगिता कोठेकर, माधुरी डिसोजा,प्राची देशपांडे, किशोर केदारी, सुहास घुमरे,नेहा जाधवराव, अशोक सोनवणे,अशोक वाघमारे, नीलिमा फाटक आदिंनी आपल्या रचना सादर केल्या.
अभिजात भाषेचा विषय घेऊन सादर केलेल्या कवितांसह विविध ढंगाच्या कविता यामुळे वैविध्य आले. प्रसिद्ध कर्मयोगिनी साहित्यिका सौ.सीमा गांधी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अधिकारी मा.सूर्यवंशी, वैरागर यांनी मंचावर उपस्थिती लावली.
या वर्षी ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर कालावधीत आयोजित करण्यात आला . निमंत्रित स्थानिक कवी संमेलन या उपक्रमाचा एक भाग होता.
