You are currently viewing चिवला बीचच्या विकासाला गती; रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

चिवला बीचच्या विकासाला गती; रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

चिवला बीचच्या विकासाला गती; रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी; सहदेव बापर्डेकर व पूनम चव्हाण यांच्याकडून कामाची पाहणी

मालवण | प्रतिनिधी :

पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मालवण येथील चिवला बीच परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी या कामासाठी उपलब्ध झाला असून, शुक्रवारी मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि टिकाऊ झाली पाहिजेत. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेऊन काँक्रिटीकरणाचे काम योग्य पद्धतीने पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिवला बीच हे मालवणमधील प्रमुख पर्यटनस्थळ असून, या परिसरात स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील रस्त्यांची सुधारणा आणि काँक्रिटीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या कामामुळे रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
कामासाठी दर्जेदार साहित्याचा वापर करून ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही सहदेव बापर्डेकर आणि पूनम चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा