*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*वार्तालाप की वार्तेचा आलाप*
परवा तो भेटला डोळे गरा गरा फिरवीत विचारता झाला
“तू काय कविता वगैरे करतोस म्हणे !”
“कोणत्या वृत्तांत लिहितोस तू? ”
“*शार्दुलविक्रीडीत* की *भुजंगप्रयाता* त लिहितो ?”
“मी *शार्दुलविक्रीडीत* मध्ये लिहीतो, तुझं काय?”
प्रश्नांची सरबत्ती.धाड धाड धाड.
“छे छे ! मी कुठले, मी कुठले ?”
मी प्रतिप्रश्न त्यालाच विचारता झालो.
“मी फक्त लिहितो किंवा शब्दां मागे शब्द मांडतो, त्यातून *गेयता* वहायला लागते आणि तुम्ही त्याला *कविता* म्हणतात,इतकंच.
अन्यथा ते एक *स्फुट लेखन* होऊन जाते”
मी *पुष्टी* की काय ते म्हणतात ते देऊन म्हणालो.
” *B A* ला संस्कृत की *मराठी* घेतलं होतं ?”,
माझी उलटतपासणी पुन्हा सुरु करुन तो विचारता झाला.
“मी ? मी ?” मी आपलं दीनवाणेपणे म्हणालो.
“तसलं काही नाही बघा, अहो ! मी कॉलेजची पायरी पण चढलो नाही,उगाच खोटं का बोलू ?”
मी आपलं सांगूनच टाकलं.
“आणि काय हो महोदय ! BA वगैरे झाल्याशिवाय लिहायचंच नसतं का ?” माझी आपली सहज पृच्छा.
*”शिकल्याने लिहिण्याचे शहाणपण येते की सुचल्याने ?”*
एक शंका म्हणून विचारता झालो.
” *उपजीविकेसाठी* काय करत होतास *प्राध्यापक* होता की *शिक्षक* ?” तरीही त्याने विचारलेच.
“नाही रे बाबा, मी आपला एक साधा यंत्रकर्मी.”
सरळसरळ सांगूनच टाकले,त्यात काय एवढे ना?
पुढे मनात एक विचार आला:
अरे देवा !
त्या *बहिणाबाई* आणि *सोपानदेव चौधरी* तर शाळेतही गेले नव्हते.
आणि ते *त्र्यंबक सपकाळे,बाबुराव बागुल* तर *रेल्वे* त नोकरी करणारे.
*बाळ कोल्हटकर* रेल्वेतच होते,*प्रशांत दामले* बी इ एस टी त तर होते.
अहो,*राजा गोसावी* तर तिकीट बारीवर तिकिटं विकायचा.
हे सांगावे का त्या महाभागास ?
“ते वृत्ता बद्दल नाही सांगितलेस तू ?”
त्यानं मला परत मूळ गावी खेचून आणलं
*”मी वृत्तात नाही तर वृत्तीत लिहितो”*
“हे काय नवीन ?”
“अरे,मी माझ्या *चित्तवृत्ती* प्रफुल्लित असल्या की लिहितो, म्हणून म्हंटलं वृत्तीत लिहितो”
-मी बापुडा घाबरत घाबरत वदलो.
“माझं सोड रे ! मी *समाज उत्थाना* साठी लिहितो,त्यांचे डोळ्यात *अंजन* घालतो. तुझे काय ?”
-तो जवळपास खेकसलाच.
“मी ? मी ही तेच करतो, मी फक्त समाजाचे डोळे उघडावे म्हणून लिहितो”
त्याचे समाधान झाले असं काही दिसलं नाही.
वृत्त, अलंकारात अडकलेल्यांना त्यातून कसं सोडवावं उमजंना.
हा प्रश्न मला असा वाटतो की,
*”आधी कोंबडी की आधी अंडं ?”*
तसंच
*”आधी वृत्त की आधी कविता ?”*
लिहीत रहावं मी म्हणतो.त्यात काय आहे ते शोधीत राहतील *वृत्त नि अलंकार* , आहे काय नि नाही काय ?
“आणि काय रे” मी अंमळसे थांबून विचारता झालो,
“जे नाव उच्चारतांना जिभेला घड्या पडतात, त्यात तू तरी का लिहितोस ?”
“सांभाळ रे बाबा स्वतःला वारंवार ते *शार्दुलविक्रीडीत* आणि *भुजंगप्रयात* उच्चारुन ती जिव्हा गळून पडायची तुझी”
“काळजी वाटते म्हणून म्हणालो”
“शाळेत ठीक होतं रे ते, सुटलो होतो त्यातून कसेबसे”
“आता आताशा नाही ते परवडणारे”
—राजा जोशी
9823687519
*ता.क.ह्या लेखात कुणाला आपली छबी दिसली तर तो योगायोग समजावा*
〰️🙏〰️🙏〰️🙏〰️
